Ticker

6/recent/ticker-posts

मराठी गझल | मराठी प्रेम शायरी Marathi Love Shayari

मराठी गझल | मराठी प्रेम शायरी Marathi Love Shayari 

गझल : मराठी प्यार शायरी
कोण कुणास बनवते हो कळत नाही।
पायात रुतला काटा सळत नाही।। 

आठवण येते उचक्या लागते हो। 
हे बघून दुश्मन माझे जळत नाहीं।। 

मोह माया प्रेम दुख हे विकार काय।
सगळेच चिपकुण बसतात पळत नाही।। 

खुल्या आकाशात अभ्रक प्रकाशात।
अंधार हवा शिवाय प्रेम वळत नाहीं।। 

फूल सुगंध सुवासीक गंध पसरतो कसा।
प्रेमानें जरा का हात मळत नाही।। 

रोज नटेन सजुन घरा बाहेर जाते।
प्रेम या झाडाचे पान हळत नाही।। 

'शहज़ाद 'निसर्ग प्रेम करणारयांचा।
प्रेम भजे प्रेमा शिवाय तळत नाहीं।। 

मजीदबेग मुगल 'शहजाद'
हिगनघाट, जि, वर्धा,महाराष्ट्र 
8329309229

गज़ल कविता अशी : मराठी शायरी

कसल्या कविता ऐकवता छंद नाही।
ताल सुरांचा कसला बघा गंध नाही।। 

जीवनाचे अनेक प्रश्न कोण सागंल ।
उदाहरण बुध्दी चे समझ मंद नाही। 

आनंद सगळ्यांना हवा मात्र मोफत।
कुणाच साठी खेळायची जंग नाही। 

उतरत्या वयात शब्द हे अनुभव हो।
त्यात बनावटी कसलाच रंग नाही।। 

कविता ही शस्त्र आहे क्रांति चे अंकुर।
समुद्र लाटा विनाश प्रतिक तरंग नाही 

आनंद देते कविता लोरी अंगाई।
मनात असेल खंत म्हणाले ढंग नाही।। 

शहज़ाद 'कवी आरसा असे जगाचा।
आजकाल बहकला पेला भंग नाही।। 

कवी÷मजीदबेग 'शहज़ाद हिगनघाट, जि,वर्धा, महाराष्ट्र 8329309229

Post a Comment

0 Comments